मुंबई पोलिसांना धमकीचा फोन करणाऱ्याला अटक ; दारुच्या नशेत फोन केल्याची पोलिसांची माहिती

मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी या व्यक्तीने फोन करुन मुंबई पोलिसांना दिली होती.
मुंबई पोलिसांना धमकीचा फोन करणाऱ्याला अटक ; दारुच्या नशेत फोन केल्याची पोलिसांची माहिती

मुंबई पोलिसांना दमकीचा कॉल करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या जुहू पोलिसांनी जुहू परिसरातून या व्यक्तीला अटक केली आहे. तसंच त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. त्याने दारुच्या नशेत धमकीचा फोन केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आज (६ ऑगस्ट) रोजी मुंबई पोलिसांना धमकीचा फोन आला होता. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी या व्यक्तीने फोन करुन मुंबई पोलिसांना दिली होती. आपण मुंबईच्या विलेपार्ले परिसरातून बोलत असल्याचा दावा या व्यक्तीने केला होता.

मुंबई पोलिसांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार पोलीस नियंत्रण कक्षाला एका व्यक्तीने धमकीचा फोन केला होता. यात त्याने मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट होणार आहेत. असं सांगितलं होतं. आपण विलेपार्ले परिसरातून बोलत असल्याचं सांगून या व्यक्तीने फोन कट केला होता.यानंतर या व्यक्तीने आपला फोन बंद केला होता. यानंतर पोलिसांनी सुत्रे हलवत या प्रकरणचा तपास सुरु केला. जुहू पोलिसांनी या धमकी देणाऱ्या व्यक्तीला जुहु परिसरातून अटक केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in