मुंबई पोलिसांची नागपाड्याती बॅग कारखान्यावर धाड ; ८ बाल मजुरांची सुटका

यापूर्वी देखील माझगाव परिसरातील दारूखाना येथील एका बॅग बनविण्याच्या कारखान्यातून १३ मुलांची सुटका करण्यात आली होती
मुंबई पोलिसांची नागपाड्याती बॅग कारखान्यावर धाड ; ८ बाल मजुरांची  सुटका

मुंबईतील नागपाडा परिसरात पोलिसांनी बॅग बनवण्याच्या कारखाण्यात धाड टाकून आठ बाल कामगारांची सुटका केली आहे. याप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात सविस्तर गुन्हा नोंदवून दोन आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी देखील माझगाव परिसरातील दारूखाना येथील एका बॅग बनविण्याच्या कारखान्यातून १३ मुलांची सुटका करण्यात आली होती.

नागपाडा येथील मदनपुरा भागातील दोन कारखान्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी बॅग कारखान्याचा व्यवस्थापक हसमतुल्लाह अब्दुल माजिद मन्सुरी (२०), अब्दुल रेहमान शेख (२५) यांना अटक केली आहे. सुटका करण्यात आलेली मुलं या कारखान्यात बॅग शिवण्याचं काम करत होते. गेल्या अनेक दिवसांपासून ही मुलं याठिकाणी काम करत असल्याचा दाट संशय पोलिसांना व्यक्त केला आहे. पथकाने सामाजिक संस्थेच्या मदतीने आठ मुलांची सुटका केली आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेले लोक या मुलांकडून १० ते १२ तास काम करून घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

याआधी माझगाव भागातून बॅगच्या कारखान्यातून १३ मुलांची सुटका करण्यात आली होती. या मुलांना बिहार येथून आणण्यात आलं होते. यात एका सात वर्षांच्या मुलाचाही समावेश होता. मुलांना क्रूरपणे वागणूक देत कामावर ठेवल्याप्रकरणी कारखाना मालक गौस मोहम्मद फराज मेहबूब अन्सारी (२६) यांच्यावर पोलिसांनी कडक कारवाई केली होती. या मुलांची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली असून त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

logo
marathi.freepressjournal.in