मुंबई शेअर बाजारातील घसरण थांबली; सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला

सकाळी बाजार उघडल्यानंतर तो ५८,७४७.३१ अंकांपर्यंत घसरला. त्यानंतर दिवसभरात तो ५८,४८७.७६ पर्यंत घसरला
मुंबई शेअर बाजारातील घसरण थांबली; सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला

मुंबई शेअर बाजारात तीन सत्रापासून सुरू असलेली घसरण सोमवारी थांबली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सोमवारी ३०० अंकांनी वधारला. बँकिंग व वित्त समभागांची जोरदार खरेदी झाली.

सकाळी बाजार उघडल्यानंतर तो ५८,७४७.३१ अंकांपर्यंत घसरला. त्यानंतर दिवसभरात तो ५८,४८७.७६ पर्यंत घसरला. सेन्सेक्स ३००.४४ अंकांनी वधारून ५९,१४१.२३ वर बंद झाला. तर दिवसभरात तो ५९,२७७.५५ पर्यंत वधारला होता. तर ‘निफ्टी’ ९१.४० अंकांनी वधारून १७६२२.२५ वर बंद झाला. शुक्रवारी निफ्टी ३४६.५५ अंकांनी तर सेन्सेक्स १०९३.२२ अंकांनी घसरला होता.

बँकिंग व वित्त कंपन्यांच्या समभागांची चांगली खरेदी झाली. बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, स्टेट बँक ऑफ इंडिया, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, नेस्ले, हिंदुस्थान युनिलिव्हर, ॲक्सीस बँक, टेक महिंद्रा व इन्फोसिस आदी कंपन्यांचे समभाग वधारले. सेन्सेक्समधील ३० पैकी ८ समभाग घसरले. टाटा स्टील, पॉवरग्रीड, एनटीपीसी, एशियन पेंटस‌्, आयसीआयसीआय बँक, अल्ट्राटेक सिमेंट आदींचे समभाग घसरले. अदानी समूहाने घेतल्यानंतर अंबुजा सिमेंटस १० टक्क्याने वाढला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in