मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलल्या

काही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यापीठाकडे केली होती.
मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई विद्यापीठाच्या २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाचे द्वितीय सत्र म्हणजे हिवाळी सत्राच्या परीक्षा १० ऑक्टोबर २०२२ पासून सुरू होणार होत्या. त्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षेच्या नवीन तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील.

काही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यापीठाकडे केली होती. त्यावर विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या मागणीवर सकारात्मक विचार करून २०२२च्या हिवाळी सत्राच्या सत्र पाच बरोबरच सर्वच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठ २०२२च्या हिवाळी सत्रामध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, मानव्य विद्याशाखा, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा व आंतरशाखीय विद्याशाखा अशा चार विद्याशाखेच्या ४५० पेक्षा जास्त परीक्षा घेण्यात येणार आहेत.

दिवाळीनंतर परीक्षेचे नियोजन

२०२२च्या हिवाळी सत्राच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार विद्यापीठाने या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा दिवाळीनंतर घेण्याचे नियोजन आहे. सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in