एसटी बसेसचे राजकारणासाठी ऐन सणासुदीत ‘सीमोल्लंघन’; प्रवाशांचे होतायत हाल !

जिल्ह्यातील ४५० पैकी १६० एसटी बस दोन दिवस मुंबईत राहणार आहेत. प्रवाशांच्या सेवेत राहणाऱ्या बसेसचे राजकारणासाठी ऐन सणासुदीत ‘सीमोल्लंघन’
एसटी बसेसचे राजकारणासाठी ऐन सणासुदीत ‘सीमोल्लंघन’; प्रवाशांचे होतायत हाल !

शिवसेनेत दोन गट तयार झाल्यानंतरचा आज पहिला दसरा आहे. शिवसेनेचे दोन्ही गट आपली राजकीय ताकद दाखविन्यासाठी मुंबईमध्ये होणाऱ्या मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांची वाहतूक करण्यासाठी एसटी महामंडळाच्या १७०० बसेस शिंदे गटाकडून बुक करण्यात आल्या आहेत. रायगड मधून मुंबईत होणाऱ्या मेळाव्यासाठी १६० बस रवाना केल्या असल्याची माहिती मिळत आहे.

रायगड विभाग नियंत्रक विकास माने यांनी दिली. परिणामी जिल्ह्यातील प्रवाशांचे व मुलांचे हाल होत आहे.जिल्ह्यातून १६० एसटी बसेस भरून राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते जाणार आहेत. जिल्ह्यातील ४५० पैकी १६० एसटी बस दोन दिवस मुंबईत राहणार आहेत. प्रवाशांच्या सेवेत राहणाऱ्या बसेसचे राजकारणासाठी ऐन सणासुदीत ‘सीमोल्लंघन’ होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.  मुंबईत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दसरा मेळावा होणार आहेत. त्यासाठी कार्यकर्त्यांना मेळाव्यासाठी मुंबईला नेण्याची दोन्ही गटांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.

दसरा मेळाव्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते मुंबईला जात असून, रायगड जिल्ह्यातून दसरा मेळाव्यासाठी १७० बसगाड्यांचे बुकिंग करण्यात आले आहे. जिल्ह्यातील महाड आणि कर्जत या दोन आगारांतून या बसेस पाठविण्यात आल्या आहेत. कमी भारमान असलेल्या म्हणजे कमी प्रवासी असलेल्या बसगाड्यांच्या फेऱ्या स्थगित ठेवण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती विकास माने यांनी दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in