कचरागाडीवर मद्यधुंद चालक; वाहनातील कचरा रस्त्यावर, अपघाताबाबत भीतीचे वातावरण

बोरिवली येथील गोराई डेपोजवळ मुंबई महापालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या गाड्या मद्यधुंद चालकांकडून वेगाने चालवल्या जात आहेत. यामुळे रस्त्यावर गाडीत असलेला कचरा पडत राहतो. परिणामी मागून वेगाने येणारी वाहने रस्त्यावर पडल्यालेल्या कचऱ्यावरून घसरत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
कचरागाडीवर मद्यधुंद चालक; वाहनातील 
कचरा रस्त्यावर, अपघाताबाबत भीतीचे वातावरण
Published on

मुंबई : बोरिवली येथील गोराई डेपोजवळ मुंबई महापालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या गाड्या मद्यधुंद चालकांकडून वेगाने चालवल्या जात आहेत. यामुळे रस्त्यावर गाडीत असलेला कचरा पडत राहतो. परिणामी मागून वेगाने येणारी वाहने रस्त्यावर पडल्यालेल्या कचऱ्यावरून घसरत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी या परिसरातून वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मुंबईच्या कानाकोपऱ्यातून मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने दररोज कचऱ्याचे संकलन केले जाते. त्यानंतर त्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. बोरिवली पश्चिम येथील गोराई बसडेपोजवळ कचरा संकलन करणारी वाहने वेगाने चालवली जात असल्याचे निदर्शसनास आले आहे.

या ठिकाणी अधिक वेगाने वाहने चालवली जात असल्याने कचरा रस्त्यावर पडल्याचे पाहायला मिळत आहे. तर पडलेल्या कचऱ्यामुळे रस्त्यावरून वाहने घसरत असल्याच्या घटना घडत आहे. यामुळे मंगळवारी स्थानिकांनी पाठलाग करून वेगाने जाणाऱ्या कचरागाडीला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. यावेळी, कचरा वाहन चालवणारे चालक दारू पिऊन वेगाने गाडी चालवतात आणि त्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्सही नसल्याची धक्कादायक बाब समोर आली.

logo
marathi.freepressjournal.in