Mumbai : डोसामध्ये उंदीर सापडल्याचा बनाव; खंडणीवसुलीप्रकरणी दोन महिलांना अटक

बोरिवली पश्चिमेकडील ‘राधाकृष्ण हॉटेल बँक्वेट फास्ट फूड’च्या मालकाची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Mumbai : डोसामध्ये उंदीर सापडल्याचा बनाव; खंडणीवसुलीप्रकरणी दोन महिलांना अटक
Published on: 

मेघा कुचिक/मुंबई

बोरिवली पश्चिमेकडील ‘राधाकृष्ण हॉटेल बँक्वेट फास्ट फूड’च्या मालकाची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या महिलांनी हॉटेल व्यावसायिक जय शाह (४४) यांच्याकडून आधी १ लाख रुपये उकळले आणि त्यानंतर आणखी ६ लाखांची मागणी केली होती. मानसी आचार्य (३६) आणि किंजल भाटिया (२९) अशी आरोपी महिलांची नावे आहेत.

‘फ्री प्रेस जर्नल’ने पाहिलेल्या एफआयआरनुसार, कांदिवली पश्चिम येथील रहिवासी असलेले शाह हे बोरिवली पश्चिम येथे हे हॉटेल चालवतात. २४ सप्टेंबरला रात्री ९ वाजण्याच्या सुमाराला मानसी आचार्य ही एक मूल आणि दोन पुरुषांसह हॉटेलमध्ये आली होती. या समूहाने म्हैसूर डोशासह अनेक खाद्यपदार्थ मागवले. डोशाचे अर्धे सेवन केल्यानंतर मानसीसोबत आलेल्या अमित त्रिवेदी नावाच्या व्यक्तीने डोशामध्ये उंदीर सापडल्याचे सांगत हॉटेलमध्ये गोंधळ घातला आणि पोलिसांना बोलावले तसेच त्याने डोशाचा एक व्हिडिओही रेकॉर्ड केला. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) २८ सप्टेंबरला हॉटेलचा परवाना निलंबित केला होता. त्यामुळे हॉटेल बंद ठेवावे लागले होते.

पोलिसांनी सापळा रचून केली कारवाई

मानसी आणि तिची बहीण किंजल भाटिया या दोघी शाह यांना हॉटेलमध्ये भेटल्या आणि त्यांनी २५ लाखांची मागणी कायम ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. चर्चेदरम्यान ही रक्कम हळूहळू कमी करून २० लाख नंतर १५ लाख आणि शेवटी ७ लाखांवर आणण्यात आली. या दोन्ही महिलांनी शाह यांच्याकडून १ लाख रुपये उकळले. मात्र, त्त्याची मागणी सुरूच ठेवली. अखेर पोलिसांच्या मदतीने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in