बोरिवली-मुलुंड एक तासांत ९०० मीटर लांब सिमेंट क्राँकिटचा पूल बांधणार ;जीएमएलआरवरून थेट उपनगरात प्रवास

गोरेगाववरून पूर्व उपनगरात मुलुंड गाठण्यासाठी जीएमएलआर बांधला जात आहे. रत्नागिरी हॉटेलपासून हा नवीन उड्डाणपूल जोडला जाणार आहे
बोरिवली-मुलुंड एक तासांत ९०० मीटर लांब सिमेंट क्राँकिटचा पूल बांधणार ;जीएमएलआरवरून थेट उपनगरात प्रवास

मुंबई : मालाड पश्चिम येथील मालाड हिल रिझरवायर ते लोखंडवाला कॉम्प्लेक्सदरम्यान नवीन पूल बांधण्यात येणार आहे. ९०० मीटर लांबीचा हा पूल सिमेंट क्राँकिटचा बांधण्यात येणार असून पोहोच रस्ताही सिमेंट क्राँकिटचा बांधण्यात येणार आहे. हा पूल गोरेगाव-मुलुंड लिंक रोडला जोडण्यात येणार आहे. यामुळे बोरिवली-मुलुंड दरम्यानचा प्रवास एक तासांत पार करता येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल १८० कोटी रुपये खर्चणार आहे.

मुंबईतील वाहतूककोंडीवर उपाय म्हणून नवीन पूल बांधण्यात येत आहेत. पश्चिम उपनगरातील विशेषत: मालाड हिल रिझरवायर ते लोखंडवाला कॉम्प्लेक्सला जोडणाऱ्या अप्पापाडापर्यंत १८.३० मीटर डीपी रोड फेज वनचा विकास करण्यात येणार आहे. यासाठी डिझाइन, बिल्ट, काँक्रिट पूल, स्टील ब्रीज, टनेल ब्रीज व सिमेंट क्राँकिट कॅवरेझचे बांधकाम तसेच ३६.६० डीपी रोडच्या कामासाठी अहवालाची समीक्षा, प्रोजेक्ट रिपोर्ट, गुणवत्ता हमी, गुणवत्ता नियंत्रण व गुणवत्ता ऑडिटसाठी प्रकल्प व्यवस्थापन कन्सल्टंटची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून ९०० मीटर लांब सिमेंटचा पूल व सिमेंटचा पोहोच रस्ता बांधण्यात येणार आहे. यासाठी १८० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या पूल विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

गोरेगाववरून पूर्व उपनगरात मुलुंड गाठण्यासाठी जीएमएलआर बांधला जात आहे. रत्नागिरी हॉटेलपासून हा नवीन उड्डाणपूल जोडला जाणार आहे. या पुलाचा फायदा बोरिवलीपर्यंतच्या नागरिकांनाही होणार आहे. बोरिवलीहून मुलुंडला पोहोचण्यासाठी दोन तासांचा कालावधी लागतो. नवीन पुलामुळे हे अंतर पाऊण ते एक तासापर्यंत कमी होऊ शकेल. जीएमएलआर झाल्यानंतर नागरिकांना पूर्व द्रुतगती महामार्ग वापरण्याची गरज पडणार नाही, अशी माहिती पालिकेच्या रस्ते विभागातील अधिकाऱ्याने दिली.

असा होणार पूल

मालाड जलाशय ते लोखंडवाला कॉम्प्लेक्स

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडने जोडणार

पूल बांधकामाचा कालावधी पावसाळा वगळून ४८ महिने

१८० कोटी रुपये खर्च होणार

पहिल्या टप्प्यात काय?

१८.३० मीटर मार्गाचा विकास

३६.६० मीटर मार्गाचे काम

९०० मीटर लांबीचा पूल

सिमेंट काँक्रि

ट, स्टीलचा वापर

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in