

मुंबई : बोरिवली (पूर्व) येथे कराटेच्या क्लासला जात असलेल्या १८ वर्षांच्या विद्यार्थ्याला भररस्त्यात थांबवून धर्मांतरासाठी त्याच्यावर दबाब आणल्याच्या आरोपावरून तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्रनगर येथील गोल्डन मैदानाजवळून हा विद्यार्थी कराटे क्लासला पायी जात असता एका महिलेसह तिघा जणांनी त्याला अडवून त्याचा धर्म कोणता आहे, अशी विचारणा केली आणि त्याच्या धर्माबद्दल अपशब्द काढले.
त्यानंतर तिघांनी त्याला धर्मांतरण करण्यासाठी सुचवून त्यासाठी आमीषही दाखवले. विद्यार्थ्याने त्यास नकार देत ती बाब त्याच्या कराटे क्लासच्या शिक्षकांना सांगितली. ही बाब भाजपच्या बोरिवली विधानसभा सचिव ॲड. सीमा शिंदे यांना समजताच त्यांनी त्या दोघांसह कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसात तक्रार दाखल केली.