आम्हा दोघांची डिग्री एकच-जेल रिटर्न

छगन भुजबळ यांनी घेतली नवाब मलिक यांची भेट
आम्हा दोघांची डिग्री  एकच-जेल रिटर्न

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. भुजबळ यांनी मलिक यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी आम्हा दोघांची डिग्री एकच आहे, ती म्हणजे जेल रिटर्न अशी मार्मिक प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे तब्बल दीड वर्षानंतर तुरूंगातून बाहेर आले आहेत. दोन महिन्याच्या वैदयकिय जामिनावर ते बाहेर आले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी मलिक यांची भेट घेण्यास सुरूवात केली आहे. आधी खा.सुप्रिया सुळे यांनी मलिक यांची भेट घेतली. मंगळवारी अजितदादा गटाच्या प्रफुल पटेल, सुनिल तटकरे आदी नेत्यांनी मलिक यांची भेट घेत विचारपूस केली. आता अजितदादा गटाचेच ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी नवाब मलिक यांची भेट घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जेव्हा फूट पडली, तेव्हा नवाब मलिक हे तुरूंगात होते. मलिक हे नेमक्या कोणत्या गटात जाणार याबद्दल अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, मलिक हे आमचे जुने मित्र आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आम्ही भेट घेतली. त्यात राजकारणाचा भाग नव्हता, असे प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in