भांडुपमध्ये प्रियकराची गळफास घेऊन आत्महत्या ;प्रेयसीसह पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पैशांच्या मागणीला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप
भांडुपमध्ये प्रियकराची गळफास घेऊन आत्महत्या ;प्रेयसीसह पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई - भांडुप येथे दत्तगुरु कृष्णा कोळी या ३५ वर्षांच्या प्रियकराने गळफास लावून आत्महत्या केली. या आत्महत्येप्रकरणी त्याची प्रेयसीसह पतीविरुद्ध भांडुप पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. रेशमा सचिन सोलंकी ऊर्फ रेश्मा सुरवाडे आणि सचिन सोलंकी अशी या दोघांची नावे असून सतत होणार्‍या पैशांच्या मागणीला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप दत्तगुरुची पत्नीने केला आहे. प्रतिक्षा कोळी ही महिलाा रायगडच्या अलीबागची रहिवाशी असून मृत दत्तगुरु हा तिचा पती आहे. तो बोटीवर काम करतो तर प्रतिक्षा ही मासे विक्री करते. २०१० रोजी तिचे दत्तगुरुशी विवाह झाला असून या दोघांना दोन मुले आहेत.

दोन वर्षांपूर्वी दत्तगुरुचे मामा परशुराम कोळी हे आजारी असल्याने त्यांना जे. जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात ाअले होते. तिथेच सचिन हा पोस्टमॉर्टम विभागात काम करत असल्याने त्याची सचिनची पत्नी रेश्माशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. काही महिन्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यानंतर दत्तगुरु हा नेहमी रेश्माला भेटण्यासाठी मुंबईत येत होता. अनेकदा तो तिच्या घर दहा ते पंधरा दिवस राहत होता. ही माहिती नंतर प्रतिक्षाला समजली होती. यावेळी दत्तगुरुने रेश्मा ही त्याची पत्नी असल्याचे सांगितले होते. अनेकदा तो रेश्माला गावातील विविध लोकांकडून उसने तसेच घरातील दागिने विकून पैसे घेऊन देत होता. डिसेंबर २०२१ रोजी रेश्मा ही तिचा पती सचिन आणि तीन मुलांसोबत त्यांच्यासोबत दोन दिवसांसाठी राहण्यासाठी आली होती. १७ सप्टेंबर २०२३ रोजी तो कोणालाही काहीच न सांगता रेश्माच्या भांडुप येथील घरी निघून गेला होता. तिथेच त्याने २५ सप्टेंबरला गळफास लावून आत्महत्या केली होती.

ही माहिती नंतर भांडुप पोलिसांना प्रतिक्षाला समजली होती. पतीचा सर्व विधी पूर्ण केल्यानंतर ती भांडुप पोलीस ठाण्यात तिचा जबाब नोंदविण्यासाठी आली होती. त्यात तिने रेश्मासह तिचा पती सचिन सोलंकी हे दोघेही तिचा पती दत्तगुरुकडे सतत पैशांची मागणी करत होते. त्याच्याशी पैशांवरुन वाद घालत होते. सतत पैशांच्या मागणीला तो कंटाळून गेला होता. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप करुन या दोघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर रेश्मा सुरवाडे आणि सचिन सोलंकी या दोघांविरुद्ध पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in