प्रियकराने केली प्रेयसीची हत्या,फरारी प्रियकराला काही तासांत अटक

क्षुल्लक वादातून ही हत्या झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
प्रियकराने केली प्रेयसीची हत्या,फरारी प्रियकराला काही तासांत अटक

मालवणीतील एका गेस्ट हाऊसमध्ये प्रियकरानेच प्रेयसीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हत्येनंतर पळून गेलेल्या प्रियकराला काही तासांत मालवणी पोलिसांनी अटक केली. अमित अनंत भुवड असे या आरोपीचे नाव असून, अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. क्षुल्लक वादातून ही हत्या झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. कांदिवलीतील एका खासगी कंपनीत अमित हा सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होता. याच कंपनीत मृत महिला हीदेखील कामाला होती. या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते.ते नेहमीच मालवणीतील मढ येथील एका गेस्ट हाऊसमध्ये येत होते. सोमवारी ते दोघेही या गेस्ट हाऊसमध्ये आले होते. मंगळवारी दुपारी अमित हा गेस्ट हाऊसमधून एकटाच बाहेर पडला.

त्यानंतर मॅनेजर या रूमची पाहणी करण्यासाठी गेला; मात्र आतून दरवाजा कोणीच उघडला नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याने मालवणी पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी रूममध्ये पोलिसांना या महिलेचा मृतदेह दिसून आला. प्राथमिक तपासात तिची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी प्रियकराविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली. त्याला कांदिवली येथून पोलिसांनी अटक केली. त्याने हत्या केल्याची कबुली दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in