ब्रेन डेड मुलाने दिले १३ वर्षीय मुलीला जीवदान

तीन वर्षांनंतर डायलेसिसवर मात; वाडिया रुग्णालयात किडनी प्रत्यारोपण यशस्वी
ब्रेन डेड मुलाने दिले १३ वर्षीय मुलीला जीवदान

गंभीर अपघातात मेंदूला दुखापत झालेल्या १२ वर्षीय मुलाला डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केले. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी मुलाची किडनी अवयवदान करण्यास परवानगी दिली. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून डायलिसिसवर असणाऱ्या ऐरोली येथील अवघ्या १३ वर्षाच्या मुलीवर कॅडेव्हिरक रेनल ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. परळ येथील बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रेनमध्ये ही पहिली कॅडेव्हरिक किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. त्यामुळे ब्रेन डेड मुलाने दिले १३ वर्षीय मुलीला जीवनदान दिले आहे.

ही शस्त्रक्रिया प्राध्यापक आणि युरोलाँजी सर्जरी विभागाच्या प्रमुख डॉ. प्रज्ञा ब्रेंद्रे यांच्या नेतृत्वाखाली डाँ.उमा अली, पेडीयाट्रीक युरोलाँजी सर्जन आणि बाल नेफ्रोलॉजी केईएम रूग्णालयाच्या डाँक्टरांच्या मदतीने यशस्वी करण्यात आली आहे. दरम्यान, १२ वर्षीय मुलाचा गंभीर अपघातात मेंदूला दुखापत झाल्याने डॉक्टरांनी त्याला ब्रेनडेड घोषित केलं. कुटुंबियांना डॉक्टरांनी मुलाचे अवयवदान करण्याची परवानगी मागितली. त्यानुसार कुटुंबियांनी या मुलाची किडनी दान केली. या मुलाच्या किडनीदानामुळे १३ वर्षांच्या मुलीला नव्याने आयुष्य मिळाले आहे.

ऐरोलीमध्ये राहणारी आर्य़ा पाटील या मुलीचे मूत्रपिंड निकामी झाल्याचे ४ वर्षापुर्वी समजले. सुरुवातीला एक वर्ष विविध उपचार करूनही तब्येतीत कोणतीही सुधारणा दिसून आली नाही. नंतर पुढे किडनी नैसर्गिकरित्या कार्य करत नसल्याने किडनी प्रत्यारोपणाची गरज होती. या मुलीला अल्पोर्ट सिंड्रोम हा एक दुर्मिळ अनुवांशिक आजार होतो जो किडनीवर परिणाम करत होतोच शिवाय श्रवणदोष होऊ शकतो.

ही मुलगी अवघ्या नऊ महिन्यांची असताना तिची श्रवणशक्ती कमी झाली होती. वयाच्या १८ महिन्यात तिला कॉक्लियर इम्प्लांट करावे लागले. जेव्हा ती आठ वर्षांची झाली तेव्हा तिचे मूत्रपिंड निकामी झाले आणि वाडीया रूग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी तिच्या कुटुंबियांना मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला तोवर ती डायलेसिसद्वारे उपचार घेत होती आणि सोबतच तिचे नाव किडनी प्रत्यारोपणासाठी कॅडेव्हर यादीत नोंद करण्यात आली होती. अनेक महिने प्रतीक्षा यादीत राहिल्यानंतर तिला अखेरीस एका ब्रेनडेड मुलाची किडनी उपलब्ध झाली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in