
मुंबई विमानतळावर खासगी विमान कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. खराब हवामानामुळे हे विमान कोसळल्याची माहिती समोर येत आहे. या विमानत असलेल्या प्रवाशांचा देखील मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.विशाखापट्टनमवरुन मुंबईला येत असताना या विमानाला अपघात झाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार विमान लँडिंग करताना ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. या विमानात सहा प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्स असे आठ जण प्रवास करत असल्याचं देखील सांगितलं जात आहे.
हे खासगी विमान विशाखापट्टणमवरुन मुंबईकडे येत हते. मुंबईत सुरु असलेल्या पावसामुळे सध्या हवामान खराब आहे. मुंबई विमान तळावर लँडिंग करत असताना विमान नियंत्रणाबाहेर गेल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.