कांदिवली, दहिसर बोरिवलीतील पूल होणार मजबूत ;पुलांच्या दुरुस्तीसाठी पालिका ४३ कोटी रुपये खर्चणार

पश्चिम उपनगरातील कांदिवली येथील १, दहिसर १ व बोरिवलीतील दोन पूल कमकुवत झाले आहे.
कांदिवली, दहिसर बोरिवलीतील पूल होणार मजबूत ;पुलांच्या दुरुस्तीसाठी पालिका ४३ कोटी रुपये खर्चणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड दरम्यान असलेल्या पुलांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका ४१ कोटी रुपये खर्च करणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात कांदिवली, बोरिवली व द हिसर येथील चार पुलांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका ४३ कोटी ४५ लाख ६४ हजार ७९० रुपये खर्चणार आहे. विशेष म्हणजे या पुलांची मेजर दुरुस्ती पुलावरील वाहतूक सुरू ठेवून करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या पूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

पश्चिम उपनगरातील कांदिवली येथील १, दहिसर १ व बोरिवलीतील दोन पूल कमकुवत झाले आहे. त्यामुळे पुलावरील बेरिंग बदलणे, डागडुजी करणे अशी कामे हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून, पावसाळ्यासह पुढील दोन वर्षांत ही कामे पूर्ण करणे पात्र कंत्राटदाराला बंधनकारक आहे, असे पालिकेच्या पूल विभागाकडून सांगण्यात आले.

याआधी पहिल्या टप्प्यात वांद्रे, अंधेरी, गोरेगाव आणि मालाड या भागांचा समावेश असलेल्या तीन विभागांतील पुलांची कामे केली जाणार आहेत. हा निर्णय घेण्यापूर्वी महापालिकेच्या प्रमुख अभियंता (पूल) यांच्याकडून या विभागातील पुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणासाठी मे. एस.जी.सी. कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या अहवालानंतर मालाड पी-उत्तर विभागातील १६ पूल, गोरेगाव पी-दक्षिण येथील २१ पूल आणि अंधेरी के-पश्चिम वॉर्डमधील १३ पुलांची निवड करण्यात आली.

'हे' पूल होणार मजबूत

आर उत्तर दहिसर - सी एस लिंक रोड आरओबी

आर दक्षिण - राजगुरू नगर

आर मध्य बोरिवली - जनरल करिअप्पा

आर मध्य बोरिवली - सुधीर फडके पूल

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in