ब्रिटिशकालीन कर्नाक पूल इतिहासजमा होणार; मध्य रेल्वेकडून होणार तोडकाम

२०१८ मध्ये कोसळल्यानंतर मुंबईतील धोकादायक आणि जीर्ण अवस्थेतील ब्रिटिशकालीन पुलाचे सुरक्षा ऑडिट करण्यात आले हो
 ब्रिटिशकालीन कर्नाक पूल इतिहासजमा होणार; मध्य रेल्वेकडून होणार तोडकाम
Published on

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते मस्जिद स्थानकादरम्यान असलेला १५० वर्षे जुना ब्रिटिशकालीन कर्नाक बंदर पूल जीर्ण झाल्याने नव्याने बांधण्यात येणार आहे. नुकतेच मध्य रेल्वेने कर्नाक उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्याची सूचना मुंबई वाहतूक पोलिसांना दिल्या होत्या. तसेच पूल तोडण्यासाठी देखील तयारी सुरू केली होती. मात्र वाहतूक पोलिसांकडून अटी शर्थी ठेवण्यात आल्या होत्या. त्याची पूर्तता झाल्यानंतर आता वाहतूक पोलीसांकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे दोन ते तीन दिवसात पुलाच्या तोडकामास सुरुवात होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेच्या हद्दीत येणाऱ्या या पुलाचे बांधकाम पालिकेद्वारे केले जाणार आहे. यासाठी हा मार्ग साधारणता दीड वर्ष वाहतुकीस बंद राहणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या अंधेरीतील गोखले उड्डाण पुलाकडील पादचारी पुलाचा भाग जुलै २०१८ मध्ये कोसळल्यानंतर मुंबईतील धोकादायक आणि जीर्ण अवस्थेतील ब्रिटिशकालीन पुलाचे सुरक्षा ऑडिट करण्यात आले होते. त्यानुसार, पश्चिम रेल्वे मार्गावरील लोअर परळ उड्डाण पूल आणि हँकॉक उड्डाण पुल पाडण्यात आले. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते मस्जिद स्थानकादरम्यान असलेला दक्षिण मुंबईतील जुन्या पुलांपैकी एक असलेला कर्नाक बंदर पूल लोखंडी गर्डर आणि दगडी बांधकामाचा वापर करून हा पूल उभारण्यात आला आहे. सध्या तो जीर्ण झाला असल्याने आयआयटी बॉम्बेने २००९ मध्ये या पुलाला धोकादायक घोषित केले आहे. त्यामुळे आता मध्य रेल्वे असुरक्षित असलेल्या कर्नाक उड्डाण पूल तोडण्याच्या तयारीला लागली आहे.त्यानंतर पालिकेने जुना पूल बांधून त्या ठिकाणी नवीन पूल उभारण्याचे निश्चित केले.

आयआयटी बॉम्बेने २००९ मध्ये या पुलाला धोकादायक घोषित केले. त्यानंतर काही काळाने यावरील जड वाहतूक कर्नाक पूल वाहतुकीस बंद झाल्यानंतर त्यावरील वाहतूक युसूफ मेहरअली मार्गावरून वळवण्यात येणार आहे. त्याआधी पालिकेच्या रस्ते विभागाने या मार्गांची पाहणी केली.

logo
marathi.freepressjournal.in