होमवर्क केला नाही म्हणून भावा-बहिणीला मारहाण

सांताक्रुझ येथील घटना; शिक्षिकेविरुद्ध गुन्हा
होमवर्क केला नाही म्हणून भावा-बहिणीला मारहाण

मुंबई : होमवर्क केला म्हणून चौदा आणि अकरा वर्षांच्या बहिण-भावाला शिक्षिकेनेच हातावर बेदम मारहाण केल्याची घटना सांताक्रुझ परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी रितू मालविया ऊर्फ बबली या ३२ वर्षांच्या शिक्षिकेविरुद्ध सांताक्रुझ पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. ३७ वर्षीय तक्रारदार मूळचे झारखंडचे रहिवाशी असून, सध्या ते त्यांच्या कुटुंबीयांसोबत सांताक्रुझ परिसरात राहतात. त्यांचे तिन्ही मनपा शाळेत शिक्षण घेत असून, याच परिसरात राहणाऱ्या रितूकडे खाजगी शिकवणीसाठी जात होते. गेल्या दोन वर्षांपासून ती त्यांच्या मुलांचे शिकवणी घेत असल्याने त्यांची चांगली ओळख होती.

मंगळवारी त्यांचा अकरा वर्षांचा मुलगा शिकवणीतून घरी आला आणि घरीच झोपला होता. यावेळी त्याच्या आईने त्याची विचारपूस केल्यानंतर त्याने त्याच्यासह बहिणीला होमवर्क केला म्हणून रितूने हातावर बेदम मारहाण केल्याचे सांगितले. त्यामुळे तिने रितूकडे मारहाणीचा जाब विचारला असता, तिच्या वडिलांनी त्यांना तेथून पिटाळून लावले. या घटनेनंतर ती दोघांनाही घेऊन कूपर रुग्णालयात गेली. तिथे प्राथमिक औषधोपचार केल्यानंतर ती दोन्ही मुलांना घेऊन सांताक्रुज पोलीस ठाण्यात आली. तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिने रितू मालवियाविरुद्ध तिच्या दोन्ही अल्पवयीन मुलांना मारहाण केल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत रितूविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

logo
marathi.freepressjournal.in