बारा कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी बिल्डरला केली अटक

फ्लॅटसाठी ३० लोकांकडून घेतलेल्या पैशांचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली
बारा कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी बिल्डरला केली अटक

सुमारे बारा कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी जयेश ठोकरशी शाह याला आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. फ्लॅटसाठी ३० लोकांकडून घेतलेल्या पैशांचा अपहार करुन त्यांची फसवणुक केल्याचा जयेश शाहवर आरोप असून त्याच्याविरुद्ध अशाच प्रकारच्या दहाहून अधिक फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जयेश हा व्यवयायाने बिल्डर असून दहा वर्षांपूर्वी त्याने अंधेरीतील ओशिवरा परिसरात गौरव लिजंट या इमारतीचे बांधकाम सुरु केले होते. या इमारतीमध्ये फ्लॅटसाठी त्याच्या कंपनीने मोठ्या प्रमाणात बुकींग घेतले होते. जवळपास तीस लोकांनी त्याच्या इमारतीमध्ये फ्लॅट बुक करताना त्याला १२ कोटी १४ लाख रुपये दिले होते. ही रक्कम दिल्यानंतर त्यांच्यात फ्लॅट खरेदी-विक्रीचा कायदेशीर करार झाला होता. मात्र जयेश शाहने प्रकल्पाच्या परवान्या घेतल्या नाही. इमारतीचे बांधकाम पूर्ण न करता संबंधित फ्लॅटधारकाच्या पैशांचा अपहार करुन त्यांची फसवणूक केली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in