Mumbai Fire : मालाडमध्ये एका 21 मजली इमारतीला भीषण आग, तरुणीने खिडकीतून मारली उडी

आग लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली. घराला आग लागल्याने एका तरुणीने खिडकीतून उडी मारली.
Mumbai Fire : मालाडमध्ये एका 21 मजली इमारतीला भीषण आग, तरुणीने खिडकीतून मारली उडी

मुंबईच्या उपनगरातील मालाडमध्ये एका 21 मजली इमारतीला भीषण आग लागली. या आगीत तीन घरे जळून खाक झाली. आगीपासून वाचण्यासाठी एका तरुणीने खिडकीतून उडी मारली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाने काही वेळातच आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुंबईतील मालाड पश्चिम येथील जनकल्याण नगर मालाड येथील 21 मजली मरिना एन्क्लेव्ह इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सकाळी 11 च्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या सहा ते सात गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.

आग लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली. घराला आग लागल्याने एका तरुणीने खिडकीतून उडी मारली. शिडीच्या सहाय्याने उतरवण्याचा प्रयत्न केला मात्र, तिला उडी मारावी लागली. तरूणीला कोणतीही दुखापत झाली नसल्याचे वृत्त आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in