घाटकोपर पूर्व येथील इमारतीला आग ; दोन जखमी

मुंबई अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले.
घाटकोपर पूर्व येथील इमारतीला आग ; दोन जखमी

मुंबई : घाटकोपर पूर्व पंतनगर येथील तळ अधिक ११ मजली सह्याद्री इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील ४०३ क्रमांकाच्या फ्लॅटला गुरुवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आग लागली. या दुर्घटनेत सचिन शेलार (३७), निर्मला शेलार (३६) हे दोघे भाजले असून त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले.

मुंबई अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. यावेळी फ्लॅट क्रमांक ४०३ मधील सचिन व निर्मला शेलार हे दोघे किरकोळ भाजल्याने जखमी झाले. दोघांना उपचारासाठी जवळील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी शेलार यांनी स्वतःहून डिस्चार्ज घेतला, तर निर्मला शेलार यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in