मीरारोडमध्ये बुलडोझर पॅटर्न; नयानगरमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई

सोमवारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दंगल करणाऱ्यांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणार असल्याचे संकेत दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
मीरारोडमध्ये बुलडोझर पॅटर्न; नयानगरमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई

भाईंंदर : मीरारोडच्या नयानगर परिसरातील अनधिकृत बांधकामावर मंगळवारी पालिकेने बुलडोझर कारवाई सुरू केली. यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पालिकेनेही ही नियमित कारवाई असल्याचे सांगितले आहे; मात्र सोमवारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दंगल करणाऱ्यांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणार असल्याचे संकेत दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

सोमवारी मीरारोडच्या नयानगर परिसरात श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती. त्यासंदर्भात अशा प्रवृत्तींच्या लोकांवर कारवाई केली जाईल, त्यांची अतिक्रमणे पाडण्यात येतील, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मंगळवारी सकाळपासूनच पालिकेने कारवाईची तयारी केली होती. संध्याकाळी ५ च्या सुमारास प्रचंड पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू करण्यात आली. ही नियमित कारवाई असल्याचे उपायुक्त मारुती गायकवाड यांनी सांगितले; मात्र रविवारी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवरच ही कारवाई होत असल्याची चर्चा आहे. आमच्याकडे पालिकेने बंदोबस्त मागितला होता. तो आम्ही दिला, असे पोलीस उपायुक्त (परिमंडळ १) जयंत बजबळे यांनी सांगितले.

व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याला अटक

भगवे झेंडे फडकावत आणि ‘जय श्रीराम’चा नारा देणाऱ्या हिंदू समाजावर मुस्लीम समुदायाच्या लोकांनी कथित हल्ला केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी अबू शेख याला मीरा-भाईंदर पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in