निवारा केंद्र वृद्धाश्रमाचा मार्ग मोकळा; २०० हून अधिक बेकायदा बांधकामांवर बुलडोझर

देवनार तानाजी मालुसरे चौकाजवळ आरक्षित भूखंडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते.
निवारा केंद्र वृद्धाश्रमाचा मार्ग मोकळा; २०० हून अधिक बेकायदा बांधकामांवर बुलडोझर
Published on

मुंबई : देवनार तानाजी मालुसरे चौकाजवळ आरक्षित भूखंडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. वारंवार नोटीस बजावल्यानंतर ही पालिकेच्या नोटीसकडे दुर्लक्ष केले जात होते. अखेर पालिकेच्या एम पूर्व विभागाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने या भूखंडावरील २०० हून अधिक बेकायदा बांधकामांवर बुलडोझर फिरवल्याने निवारा केंद्र, कौशल्य विकास केंद्र, आधार केंद्र, वृद्धाश्रम उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सन २०१५, २०१६, २०१७ मध्ये २ वेळा आणि सन २०२० मध्ये; यानुसार गेल्या काही वर्षांत एकूण ५ वेळा या भूखंडावरील अनधिकृत कच्ची बांधकामे हटविण्यात आली आहेत. परंतु, कारवाईनंतर या ठिकाणी अतिक्रमण होत होते. अतिक्रमण स्वतःहून हटवावे यासाठी जाहीर नोटीस लावण्यात आली होती. तरीही दुर्लक्ष केल्याने ही एम पूर्व विभागाने ही कारवाई केल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in