कॅसिनो खेळण्यासाठी घरफोडी; आरोपीस अटक

तीन लाख तीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले
कॅसिनो खेळण्यासाठी घरफोडी; आरोपीस अटक
Published on

मुंबई : कॅसिनो खेळण्यासाठी घरफोडी करणाऱ्या एका आरोपीस साकिनाका पोलिसांनी अटक केली. अभिमन्यू अर्जुन गुप्ता असे या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून घरफोडीचे तीन लाख तीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. अभिमन्यूविरुद्ध मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात तेराहून अधिक चोरीसह घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. साकिनाका येथे मोहम्मद शेख यांच्या राहत्या घरी घरफोडी झाली होती.

याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा नोंद होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गबाजी चिमटे यांच्या पथकाने पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरू केला होता. ही शोधमोहीम सुरू असतानाच या पथकाने झारखंडच्या रांची शहरातून अभिमन्यू गुप्ता याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. त्याला जुगार खेळण्याचा नाद होता. कॅसिनो खेळण्यासाठी त्याने ही घरफोडी केल्याचे सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in