Mumbai : कोस्टल रोड बोगद्यात 'बर्निंग कार'चा थरार; धुरामुळे वाहतूक काही काळ ठप्प

मुंबई कोस्टल रोडवरील उत्तरवाहिनी (नॉर्थबाउंड) बोगद्यात बुधवारी दुपारी १२.२५ वाजता धावत्या कारला आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे बोगद्यात वाहनचालकांमध्ये एकच घबराट उडाली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, मुंबई पोलीस आणि १०८ रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली.
Mumbai : कोस्टल रोड बोगद्यात 'बर्निंग कार'चा थरार; धुरामुळे वाहतूक काही काळ ठप्प
Published on

मुंबई : मुंबई कोस्टल रोडवरील उत्तरवाहिनी (नॉर्थबाउंड) बोगद्यात बुधवारी दुपारी १२.२५ वाजता धावत्या कारला आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे बोगद्यात वाहनचालकांमध्ये एकच घबराट उडाली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, मुंबई पोलीस आणि १०८ रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर काही वेळाने वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

ही घटना मरीन ड्राइव्हहून वरळीकडे जाणाऱ्या बोगद्यात घडली. कारला आग लागल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव बोगद्यातील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली. त्यामुळे कोस्टल रोड तसेच ब्रीच कँडी परिसरातील रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. काही काळासाठी संपूर्ण परिसरात वाहतूक ठप्प झाली होती. परंतु तासाभराच्या आत परिस्थिती नियंत्रणात आली आणि वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.

दरम्यान, बोगद्यात अडकलेल्या वाहनचालकांसाठी हा अनुभव अत्यंत धक्कादायक ठरला. आगीवर तातडीने नियंत्रण मिळविण्यात आले असून उत्तरवाहिनी मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. तसेच दक्षिणवाहिनी बोगद्यातील एक मार्गही टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आल्याचे मुंबई वाहतूक पोलिसांनी सांगितले. या आगीत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कारला आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.

गोंधळ अन् भीतीचे वातावरण...

दरम्यान, बोगद्यात अडकलेल्या वाहनचालकांसाठी हा अनुभव अत्यंत धक्कादायक ठरला. वरळीतील रहिवासी विरेन शाह यांनी सांगितले की, ‘ते एनएससीआय, वरळी येथून मरीन ड्राइव्हच्या दिशेने जात असताना अचानक समोर ज्वाळा दिसू लागल्या. काही सेकंदांतच वाहतूक पूर्णपणे थांबली. अनेक जण आपापली वाहने सोडून बोगद्यातून बाहेर पडण्यासाठी वरळीच्या दिशेने धावत होते. आरडाओरडा, गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते’, असे त्यांनी सांगितले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in