टाटा मुंबई मॅरेथॉनमुळे उद्या बस मार्गात बदल

येत्या रविवारी होणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉनमुळे बेस्टने बस मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
टाटा मुंबई मॅरेथॉनमुळे उद्या बस मार्गात बदल
PM

मुंबई : येत्या रविवारी होणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉनमुळे बेस्टने बस मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही बस गाड्या या खंडित करण्यात येणार असून काही बस मार्ग हे मॅरेथॉन संपेपर्यंत पूर्ण बंद ठेवण्यात येणार आहेत. चर्चगेट, सीएसएमटी, चौपाटी, गिरगाव, हाजी अली, वरळी, माहीम या भागात होत असल्याने या ठिकाणचे बसमार्ग हे सकाळी पहिल्या बसपासून दुपारी मॅरेथॉन संपेपर्यंत प्रभावित राहणार आहेत, असे बेस्ट उपक्रमातर्फे सांगण्यात आले आहे.

दुसऱ्या मार्गाने बदल केलेले बस मार्ग

सी १, २ म, ३ , ए५, ए६, ८म, ९, ११म, १४, १५, ए १९, ए २१, ए २५, ए २६, २८, सी ३३, ३५, ३७, ए ४२, ४४, ए ४५, ५०, सी ५१, सी ५४, ५६, ५७, ६२, ए ६३, ६६, ६७, ६९, ८० म, ए ८२, ८३, ८४ म, ए ८५, सी ८६, ८७ म, ८८, ए ९२, ए १०३, ए १०६, ए १०८, ११०, ए ११८, ए १२१, ए १२४, १२५, ए १२६, ए १३४, ए १३८, ए १३९, १५४, ए १६२, ए १६४, १६५, १६९, ए १७१, १७२, सी ३०५, ए ३५१, ए ३५७, ए ३८५

पूर्ण बंद असलेले मार्ग

ए १०५, ए ११२, ए १२३, १५५.

logo
marathi.freepressjournal.in