बेस्टच्या काही मार्गावरील बस सेवा बंद? बेस्ट प्रशासनाचा निर्णय; प्रवाशांच्या चिंतेत भर

मुंबईकरांची सेकंड लाईफलाईन असलेल्या बेस्टच्या काही मार्गावरील बस सेवा बंद करण्यात येणार आहे, असा निर्णय बेस्ट प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
बेस्टच्या काही मार्गावरील बस सेवा बंद? बेस्ट प्रशासनाचा निर्णय; प्रवाशांच्या चिंतेत भर
Published on

मुंबई : मुंबईकरांची सेकंड लाईफलाईन असलेल्या बेस्टच्या काही मार्गावरील बस सेवा बंद करण्यात येणार आहे, असा निर्णय बेस्ट प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. ज्याप्रमाणे रेल्वे प्रवासाला मुंबईकर पसंती देतात. त्याचप्रमाणे बेस्ट उपक्रमालाही नागरिकांकडून चांगला प्रतिसाद आहे. असे असताना बेस्ट प्रशासनाने घेतलेला हा निर्णय प्रवाशांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.

मुंबईच्या काही बेस्ट मार्गांवर कमी बसगाड्या आणि प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांची बसथांब्यावर वाढलेली रांग पाहता पाहता बेस्ट उपक्रमाने यावर तोडगा म्हणून हे पाऊल उचलले असल्याची माहिती समोर आली आहे. ज्याअंतर्गत अल्प प्रतिसाद असलेल्या मार्गांवरील बेस्ट बस बंद करत त्या बस जास्त गर्दीच्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. यासाठी आता किमान प्रतिसाद असलेल्या बसमार्गांचा अभ्यास केला जात असून येत्या काळात त्यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. सदर उपक्रमांतर्गत २० पेक्षा जास्त बेस्ट बसमार्ग बंद करण्याचा विचार असल्याचे समजते. याशिवाय एक ते दोन तासांच्या अंतरावर प्रवास करणारे प्रवासीही अल्प असून या मार्गांवरील सेवासुद्धा बंद करण्याचा विचार आहे बेस्टच्या वतीने केला जात असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

गर्दीच्या मार्गावर बस वळविणार

कमी प्रतिसाद मिळणाऱ्या बसमार्गांवरील बस इतर गर्दीच्या मार्गांवर वळवण्यासमवेत रेल्वे, मेट्रोला बसची जास्तीत जास्त जोड देण्याचा प्रयत्न इथे केला जाणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक श्रीनिवास यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in