कॅनडात स्थायिक होण्यासाठी पैसे घेत व्यावसायिक फरार

कामासाठी टप्याटप्याने सुमारे ७२ लाख रुपये दिले होते
कॅनडात स्थायिक होण्यासाठी पैसे घेत व्यावसायिक फरार

मुंबई : सुमारे ७२ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी खांतीलकुमार श्रणीककुमार संघवी ऊर्फ खतील शहा या व्यावसायिकाविरुद्ध मालाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कॅनडा देशात व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच तिथेच स्थायिक होण्यासाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करून एका व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा खतील शहा याच्यावर आरोप आहे. पळून गेलेल्या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

विक्रम विश्‍वनाथ फतेचंदका हे व्यावसायिक असून, त्यांची कंपनी उच्च शिक्षणासह नोकरीसाठी विदेशात नागरिकत्व आणि व्यवसायासाठी आवश्यक व्हिसा आणि इतर कायदेशीर दस्तावेज तयार करण्याचे काम करते. त्यासाठी कंपनी त्यांच्या ग्राहकांकडून कायदेशीर फी आकारते. कंपनीत विक्रम हे त्यांची पत्नी लिनासोबत इमिग्रेशनचे काम पाहत होते. तर अॅड. अमीत मेहता हे कंपनीचे सर्व कायदेशीर बाबी पाहतात.

ऑक्टोंबर २०२० रोजी त्यांची खतील शहाशी ओळख झाली होती. त्याची ऍक्मे इंटरनॅशनल नावाची एक कंपनी असून, ही कंपनी इमिग्रेशनचे काम करते. त्याची कॅनडा येथील आरसीआयसी विभागात ओळख असून तेथील लिगल वर्क करुन त्याने त्यांना कॅनडा देशात कायमस्वरुपी कायदेशीर राहण्याची परवानगी देणार असल्याचे सांगून त्यांचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना कॅनडा येथे भाड्याने जागा घेऊन स्वतचा व्यवसाय सुरू करायचा होता. तसेच तिथेच कुटुंबीयांसोबत कायमचे स्थायिक व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी खतील शहाला त्यांचे काम करण्याची विनंती करताना या कामासाठी टप्याटप्याने सुमारे ७२ लाख रुपये दिले होते.

logo
marathi.freepressjournal.in