एसटीच्या ताफ्यात वर्षअखेरीस ४ हजार नव्या बसगाड्या दाखल होणार

या बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले
एसटीच्या ताफ्यात वर्षअखेरीस ४ हजार नव्या बसगाड्या दाखल होणार

शहरापासून खेड्यापाड्यापर्यंत असलेल्या सर्वसाधारण प्रवाशांची आणि एसटी बस वाहतुकीची नाळ अधिक घट्ट करण्यासाठी एसटी महामंडळाने आपली कंबर कसली आहे. नुकतेच डिझेलवरील जास्तीचा खर्च कमी करण्यासाठी येत्या वर्षभरात १ हजार बसेस सीएनजीमध्ये परावर्तित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर महामंडळाने नादुरुस्त बसेसच्या दुरुस्ती करण्यासोबत लवकरच एसटीच्या ताफ्यात वर्षअखेरीस ४ हजार नव्या बसगाड्या दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे.

सोमवार २७ जून रोजी एसटी महामंडळाच्या झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ४ हजार बस घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून यामध्ये २ हजार इलेक्ट्रिक बसेसचा देखील समावेश करण्यात आला आहे. या बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या १६ हजार बस आहेत. त्यापूर्वी एसटीच्या ताफ्यात १८ हजार बसगाड्या होत्या.

गेल्या तीन वर्षांत नवीन बसगाड्या खरेदी करण्यात आल्या नाहीत. मात्र आयुर्मान संपुष्टात आलेल्या गाड्या भंगारात काढण्यात येत असल्याने ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी झाली आहे. परिणामी बसअभावी प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे महामंडळाने आपल्या ताफ्यातील बसगाडय़ांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ४ हजार बसगाडय़ा घेण्याच्या प्रस्तावाला महामंडळाच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. यामध्ये विजेवर धावणाऱ्या बसचाही आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in