नव्या टेक्नोलॉजीचा वापर करुन मुसळधार पाऊसातही खड्डे बुजवणे शक्य होणार

रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, हा प्रश्न वर्षानुवर्षे कायम आहे. खड्डे बुजवण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येतात
नव्या टेक्नोलॉजीचा वापर करुन मुसळधार पाऊसातही खड्डे बुजवणे शक्य होणार
Published on

मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या रस्ते विभागाच्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञानाचा प्रयोग केला जात आहे. आता रिअॅक्टिव्ह अस्फाल्ट टेक्नोलॉजीचा वापर डांबरी रस्त्यावर करण्यात येणार असून, या टेक्नोलॉजीचे वैशिष्ट्य म्हणजे मुसळधार पाऊस अन‌् खड्ड्यात पाणी असतानाही या टेक्नोलॉजीमुळे काही मिनिटांत खड्डा बुजवणे शक्य होणार असल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त (प्रकल्प) उल्हास महाले यांनी दिली. दरम्यान, यासाठी निविदा मागवल्या असून, दोन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, हा प्रश्न वर्षानुवर्षे कायम आहे. खड्डे बुजवण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येतात; मात्र दरवर्षी खड्ड्यांच्या प्रश्नावरून मुंबई महापालिकेला मुंबईकरांच्या रोषाला सामोरे जावे लागते. मुंबईकरांचा रोष पाहता यंदा खड्डे बुजवण्यासाठी जिओ पॉलिमर, एम ६००, पेव्हर ब्लॉक व रॅपिड हार्डिंग या चार तंत्रज्ञानाचा प्रयोग करण्यात आला आहे; मात्र पुन्हा एकदा नवीन तंत्रज्ञानाचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन टेक्नोलॉजीचा वापर फक्त डांबरी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in