कै. पं. रामदास कामत, कीर्ती शिलेदार यांना मानवंदना

कै. पं. रामदास कामत, कीर्ती शिलेदार यांना मानवंदना

कै. पं. रामदास कामत, कीर्ती शिलेदार, आशालता वाबगावकर या संगीत नाट्य क्षेत्रातील दिग्गजांना श्री. गोपीनाथ सावकार स्मृती विश्वस्त निधी व इव्हेंट एनीथिंग अॅण्ड एवरीथिंगच्या सहकार्याने आयोजित स्वरवंदना या कार्यक्रमाद्वारे नुकतीच सांगीतिक मानवंदना देण्यात आली.

रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे अकादमीच्या तिसऱ्या मजल्यावर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि चाहते उपस्थित होते. पं. रामदास कामत यांची 'श्रीरंगा कमला कांता' (होनाजी बाळा), 'स्वकर शपथ वचनी वाहिला' (संशयकल्लोळ), 'तम निशेचा सरला' (ययाती आणि देवयानी) 'देवाघरचे ज्ञात कुणाला' ( मत्स्यगंधा ) ही गाणी धनंजय म्हसकर यांनी सादर केली. तर 'चंद्रिका ही जणू' (मानापमान), 'कोण तुजसम सांग मज गुरुराया' (सौभद्र) ही गीते निनाद जाधव यांनी सादर केली. अतिशय चपखल व उत्तम नाट्यगीत सादरीकरणाने या तीनही दिग्गजांच्या आठवणींना उजाळा मिळाला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in