गोव्याच्या विमान तिकिटापेक्षा कॅबचे दर जास्त

वाहतूककोंडीमुळे कॅब चालकांना कमी प्रवासासाठी देखील मीटर वाढत असल्याने जादा पैसे मिळतात.
 गोव्याच्या विमान तिकिटापेक्षा कॅबचे दर जास्त

मुसळधार पाऊस आणि रेल्वे वाहतुकीचा खोळंबा हे ठरलेले समीकरण. रेल्वे विलंबाने धावत असल्याने लेटमार्क टाळण्यासाठी अथवा आपल्या घरी सुखरूप पोहचण्यासाठी प्रवाशांकडून रेल्वेऐवजी बहुतांश ओला, उबेर सारख्या कॅबने प्रवास करण्याला पसंती दिली जाते. अलीकडेच श्रवणकुमार सुवर्णा या प्रवाशाने प्रभादेवीहून डोंबिवलीच्या दिशेने जाण्यासाठी उबेर टॅक्सी बुक केली होती. यावेळी त्याला त्या प्रवासाचे दर पाहता धक्काच बसला. त्याने टाकलेल्या लोकेशन आणि प्रवासी अंतरासाठी अँग्रीगेटर कॅबमध्ये चक्क गोव्याच्या विमान तिकिटापेक्षाही अधिकचे दर पाहायला मिळाले.

यावेळी या तरुण प्रवाशाने त्यासंदर्भातची पोस्ट ट्विटरवर टाकली. यामध्ये ''मुंबईचा पाऊस, ओला-उबरचे नखरे! प्रभादेवीहून डोंबिवलीला जाण्यापेक्षा गोव्याची विमान तिकीट स्वस्त'' असे ट्वीट केले. अवघ्या काही वेळातच हे ट्वीट सर्वत्र व्हायरल होत सोशल मीडियावर अनेक मिम्स, राग व्यक्त करण्यात आला.

पावसामुळे तयार झालेले खड्डे, जागोजागी सुरु असलेली रस्त्यांची कामे, मेट्रो-मोनो यांच्या मार्गिकांमुळे रस्त्यांवर वाहतूककोंडीची मोठी समस्या निर्माण होते. याचाच नेमका फायदा ओला-उबेर कंपन्यांना होत असल्याचे अनेकवेळेस निदर्शनास आले आहे. कारण वाहतूककोंडीमुळे कॅब चालकांना कमी प्रवासासाठी देखील मीटर वाढत असल्याने जादा पैसे मिळतात. वाहतूककोंडीमुळे चक्क डबल भाडे मिळत असल्याने कॅब चालक खुश होत असले तरी प्रवाशांना मात्र भुर्दंड पडत आहे.

दरम्यान, अशीच एक घटना अलीकडेच उघडकीस आली आहे. श्रवणकुमार सुवर्णा या प्रवाशाने प्रभादेवीहून डोंबिवलीच्या दिशेने जाण्यासाठी उबेर टॅक्सी बुक केली होती. यावेळी त्याला त्या प्रवासाचे तिप्पट दर पाहायला मिळाले. यामध्ये अँपवर हॅचबॅकसाठी ३ हजार ०४१ रुपये, सिडानसाठी ४ हजार ०८१ रुपये आणि एसयूव्हीसाठी ५ हजार १५९ रुपये दाखविण्यात येत होते. हे दर पाहिल्यानंतर श्रवणकुमार सुवर्णा याने एक ट्विट व्हायरल केले. यामध्ये म्हंटले होते की, "गोव्याला जाणारे विमान माझ्या घरी जाण्यापेक्षा स्वस्त आहे” असे ट्विट अँग्रीगेटर कॅबमधील प्रवास करणाऱ्या प्रवासी श्रवणकुमार याने केले. त्याचे हे हे ट्विट चांगलेच व्हायरल होत नेटिझन्सनी अँग्रीगेटरकडून मोठ्या प्रमाणात वाढलेल्या किंमतींना विरोध केल्याचे पाहायला मिळत आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in