मुंबईत सह्याद्रीवर मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक; बैठकीत घेणार का मोठा निर्णय? सगळयांच लागून आहे लक्ष ...

माजी न्यायाधीश शिंदे समितीचे सदस्य आणि मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या गायकवाड समितीचे तत्कालीन अध्यक्ष या बैठकीत उपस्थित राहणार आहे.
मुंबईत सह्याद्रीवर मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक; बैठकीत घेणार का मोठा निर्णय? सगळयांच लागून आहे लक्ष ...
Published on

राज्यात मराठा आरक्षणासाठी लोकांचा तीव्र संताप दिसत आहे. आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे हे पुन्हा एकदा चर्च करायला तयार आहेत. आज जरांगे यांचा आमरण उपोषणाचा सहावा दिवस अजून आज काही तरी तोडगा निघेल अशी अशा सगळयांना आहे. दरम्यान, आज सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक बोलावण्यात आली आहे. समितीनं आत्तापर्यंत केलेल्या कामाचा अहवाल समिती सादर करणार आहे.

माजी न्यायाधीश शिंदे समितीचे सदस्य आणि मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या गायकवाड समितीचे तत्कालीन अध्यक्ष या बैठकीत उपस्थित राहणार आहे. मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीला समिती सदस्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील ,शंभूराज देसाई, दादा भुसे, दीपक केसरकर दिलीप वळसे पाटील, नरेंद्र पाटील, योगेश कदम यांची देखील उपस्थित असणार आहे. आज होणाऱ्या या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सकारात्कमक तोडगा काढण्याचा निर्णय न घेतल्यास मंगळवारपासून मुंबईतही राजकीय कार्यक्रम उधळून लावण्याची घोषणा आंदोलकांनी केली आहे.

या बैठकीमध्ये आज मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचसोबत या बैठकीनंतर मुख्यमंत्री मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी अंतरवली सराटी इथं रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in