उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कॅगचा अहवाल केला सादर; म्हणाले, कामात 'इतक्या' कोटींचा गैव्यवहार

आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत कॅगचा अहवाल सादर केला, यामध्ये मुंबई महापालिकेच्या कामावर ताशेरे ओढले
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कॅगचा अहवाल केला सादर; म्हणाले, कामात 'इतक्या' कोटींचा गैव्यवहार

आज विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅगचा अहवाल सादर केला. यामध्ये मुंबई पालिकेतील १२ हजार कोटींच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली. ते म्हणाले की, "मुंबई महापालिकेतील १२ हजार कोटींच्या कामाचे कॅगकडून ऑडिट करण्यात आले होते. यामधून निधीचा गैरवापर झाल्याचे समोर आले. कोरोनाकाळात केलेल्या कामांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचे दिसून आले." असे त्यांनी सांगितले. तसेच, मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाला असून योग्य यंत्रणेकडून चौकशीचा विचार केला जाईल, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस सभागृहात म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस हा अहवाल सादर करताना म्हणाले की, "प्रमुख निरीक्षणांमध्ये असे आढळते की मुंबई महापालिकेच्या २ विभागांची २० कामी ही कोणतेही टेंडर न काढता देण्यात आली. जवळपास २१४ कोटींच्या कामांसाठी टेंडर काढले गेलेले नाही. ४ हजार ७५५ कोटींची कामे ही कंत्राटदार, बीएमसी यांच्यात करारच झाला नाही. त्यामुळे महापालिकेला त्यांच्यावर कारवाईचा अधिकार उरला नाही. कॅगने अहवालामध्ये यासंदर्भात असे म्हटले आहे की पारदर्शकतेचा अभाव, ढिसाळ नियोजन आणि निधीचा निष्काळजीपणे वापर हे निरीक्षण कॅगने अहवालात नोंदवले आहे."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in