वाढदिवसांनिमित्त मागवलेले केक पडले ४९ हजारांना

भायखळा पोलिसांनी दोन स्वतंत्र फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे
वाढदिवसांनिमित्त मागवलेले केक पडले ४९ हजारांना

वाढदिवसांनिमित्त ऑर्डर केलेल्या केकसाठी एका डॉक्टरसह महिलेची सुमारे ४९ हजारांना ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना भायखळा परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी भायखळा पोलिसांनी दोन स्वतंत्र फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.

४२ वर्षांची तक्रारदार माझगाव येथे राहत असून ५ जुलैला तिच्या १३ वर्षांच्या मुलीचा वाढदिवस होता. त्यासाठी तिला काही पेस्ट्री आणि चिकन पॅकेट ऑर्डर करायचे होते. बाहेर पाऊस असल्याने तिने केक आणता आले नाही. त्यामुळे तिने गुगलवर एका केक शॉपचा मोबाइल क्रमांक मिळविला. तिथे कॉल केल्यानंतर तिने केकसह पेस्ट्री, चिकन पॅकेटचे ऑर्डर दिले होते. यावेळी समोरील व्यक्तीने तिला ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी एक क्यूआर कोड पाठविला होता. हा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर तिच्या डेबिट कार्डवरून ५५४ रुपये डेबिट झाले होते. त्यानंतर तिच्या खात्यातून अन्य काही ऑनलाइन व्यवहार झाले. या सर्व व्यवहारातून तिच्या खात्यातून ४८ हजार ५६१ रुपये डेबिट झाले होते.

ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी मसिना रुग्णालयातील एका डॉक्टरची अशाच प्रकारे फसवणूक झाली होती. या डॉक्टरने त्याच्या सहकारी डॉक्टरच्या वाढदिवसानिमित्त केकची ऑर्डर केल्यानंतर अज्ञात सायबर ठगाने त्याच्या डेबिट कार्डची माहिती घेऊन ४४० रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार निदर्शनास येताच या डॉक्टरसह महिलेने भायखळा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in