फर्स्ट क्लास पासधारकांनाही एसी लोकलमधून प्रवास करता येणार ?

पश्चिम रेल्वेवर ४८ एसी लोकलच्या फेऱ्या होत असून प्रवाशांकडून या लोकलना चांगला प्रतिसाद मिळत आहे
फर्स्ट क्लास पासधारकांनाही एसी लोकलमधून प्रवास करता येणार ?

सामान्य लोकलमधील फर्स्ट क्लास पासधारकांनाही लवकरच एसी लोकलमधून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे; मात्र त्यासाठी प्रवाशांना सामान्य लोकलमधील फर्स्ट क्लास आणि एसी लोकलच्या पासमधील फरकाची रक्कम भरावी लागणार आहे. याची सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिमकडून (क्रिस) यांच्याकडून सुरू असलेली चाचणी पूर्ण झाल्याची माहिती वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.

मध्य रेल्वेवर दररोज ५६, तर पश्चिम रेल्वेवर ४८ एसी लोकलच्या फेऱ्या होत असून प्रवाशांकडून या लोकलना चांगला प्रतिसाद मिळत आहे. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी होणाऱ्या फेऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. पूर्वी सामान्य लोकलमधील फर्स्ट क्लासमधून प्रवास करणारे प्रवासी मोठ्या संख्येने एसी लोकलकडे वळत असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने या प्रवाशांना एसी लोकलकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

लवकरच सुविधा होणार उपलब्ध

सामान्य लोकलच्या फर्स्ट क्लासमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा पास एसी लोकलच्या पासमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तिकीट खिडकीवर पासदरातील फरक भरून नवीन पास उपलब्ध करण्यात येणार आहे. यासंदर्भात ‘क्रिस’ने चाचपणी पूर्ण केल्याची माहिती रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. लवकरच ही सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे ही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in