मृत्यूपूर्व जबाबाच्या आधारे दोषी ठरविता येत नाही, सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा; हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी निर्दोष

मृत्यूपूर्व केवळ तोंडी जबाबाच्या आधारे हत्येच्या गुन्ह्यात केवळ तोंडी मृत्यूपूर्व जबाबाच्या आधारे आरोपीला दोषी ठरवू शकत नाही, असा महत्वपूर्व निर्वाळा दिंडोशी सत्र न्यायालयाने दिला आहे.
मृत्यूपूर्व जबाबाच्या आधारे दोषी ठरविता येत नाही, सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा; हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी निर्दोष
Published on

मुंबई : मृत्यूपूर्व केवळ तोंडी जबाबाच्या आधारे हत्येच्या गुन्ह्यात केवळ तोंडी मृत्यूपूर्व जबाबाच्या आधारे आरोपीला दोषी ठरवू शकत नाही, असा महत्वपूर्व निर्वाळा दिंडोशी सत्र न्यायालयाने दिला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एच. पठाण यांनी सात वर्षांपूर्वी एका वॉचमनची हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या रुद्रसेन यादवची न्यायालयाने निर्दोष सुटका केली.

साकीनाका येथेआझमी कंपाऊंड जवळ २१ मे २०१७ रोजी मध्यरात्री वॉचमन अशोकला बेदम मारहाण करण्यात आली. फिर्यादी अभिषेक सिंगने त्याला रुग्णालयात नेले होते. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी अशोकचा मृत्यूपूर्व जबाब नोंदवत त्याआधारे रुद्रसेन यादवला अटक करून हत्येचा खटला दखल केला होता. या खटल्याची अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एच. पठाण यांच्या समोर सुनावणी झाली.

यावेळी मृत्यूपूर्व जबाबाला पुष्टी देणारे पुरावे सरकारी पक्षाने सादर केलेले नाहीत, याकडे आरोपीचे वकील अमीर मलिक यांनी लक्ष वेधले. त्यांच्या युक्तिवादाची न्यायालयाने गंभीर दखल घेतली. आरोपाला पुष्टी देणारे पुरावे नाहीत. अशा स्थितीत न्यायालय केवळ तोंडी मृत्यूपूर्व जबाबाच्या आधारे आरोपीला दोषी ठरवू शकत नाही. अशोकला रुग्णालयात नेले. त्यावेळी तो जिवंत होता हे सिद्ध करण्यासाठी रुग्णवाहिकेचा चालक वा इतर कुणाची साक्ष तपासलेली नाही, असे नमूद करीत हत्येच्या आरोपातून आरोपी रुद्रसेन यादवची निर्दोष मुक्तता केली.

logo
marathi.freepressjournal.in