Captain Amarinder Singh : महाराष्ट्राच्या नव्या राज्यपाल पदी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नावाची चर्चा

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी लवकरच राजीनामा देणार असल्याची चर्चा असून त्यांच्याजागी कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amarinder Singh) यांच्या नावाची चर्चा
Captain Amarinder Singh : महाराष्ट्राच्या नव्या राज्यपाल पदी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नावाची चर्चा

महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर ते लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा होत आहे. अशामध्ये महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण होणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amarinder Singh) यांच्या नावाची चर्चा होत आहे. मात्र, अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

हेही वाचा

राज्याचे राज्यपाल राजीनामा देणार? पंतप्रधान मोदींकडे व्यक्त केली इच्छा

नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. त्यादरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदींकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. पदमुक्त होऊन उर्वरित आयुष्य चिंतन, मनन करण्यात घालवण्याचा मानस असल्याची भावना पंतप्रधान मोदींकडे व्यक्त केल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, ते लवकरच पदाचा राजीनामा देणार आहेत. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर पुढचे राज्यपाल कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची राज्यपालपदी नियुक्ती होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. मात्र, याबाबत कुठलीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in