कॅप्टन स्मित मच्छार यांना शौर्य पुरस्कार देण्याची मागणी; नागरिकांनी केली घराबाहेर गर्दी; मुंबईकरांना अभिमान

संयुक्त अरब अमिरातीतून इस्रायलला १७४ प्रवाशांना घेऊन जाणारे ‘फ्लाय दुबई’ विमान पाडण्याचा सहवैमानिकाचा प्रयत्न आपल्या शौर्याने हाणून पाडणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांच्याबद्दल मुंबईकरांना अभिमान असल्याचे गुरुवारी दिसून आले.
कॅप्टन स्मित मच्छार यांना शौर्य पुरस्कार देण्याची मागणी; नागरिकांनी केली घराबाहेर गर्दी; मुंबईकरांना अभिमान
कॅप्टन स्मित मच्छार यांना शौर्य पुरस्कार देण्याची मागणी; नागरिकांनी केली घराबाहेर गर्दी; मुंबईकरांना अभिमान
Published on: 

मुंबई : संयुक्त अरब अमिरातीतून इस्रायलला १७४ प्रवाशांना घेऊन जाणारे ‘फ्लाय दुबई’ विमान पाडण्याचा सहवैमानिकाचा प्रयत्न आपल्या शौर्याने हाणून पाडणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांच्याबद्दल मुंबईकरांना अभिमान असल्याचे गुरुवारी दिसून आले. मच्छार यांच्या कृतीने भारावून केलेल्या मुंबईकरांनी त्यांच्या सन्मानार्थ गुरुवारी टिळकनगर येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर शेकडो नागरिकांनी तिरंगा हातात घेऊन गर्दी केली.

‘फ्लाईदुबई’च्या विमानाच्या कॉकपिटमध्ये सहपायलटने कॅप्टन मच्छार यांच्यावर चाकूने वार केल्यामुळे विमान जवळपास १४,००० फूट खाली कोसळले होते. या घटनेनंतर, कॅप्टन मच्छार यांनी सुरक्षितपणे विमान सौदी अरेबियात उतरवले. कॅप्टन मच्छार जखमी झाले आहेत. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी ‘स्वास्तिक हाइट्स’ या निवासी संकुलाबाहेर जमलेले नागरिक त्यांचे फोटो हातात घेऊन प्रार्थना करत होते.

टिळकनगर येथे जमलेल्या अनेकांनी कॅप्टन मच्छार यांना ‘शौर्य चक्र’ किंवा ‘भारतरत्न’ या सारखा शौर्य पुरस्कार मिळावा, अशी मागणी नागरिकांनी केली.

‘मी कॅप्टन स्मितला तो लहान असल्यापासून ओळखतो आणि त्यांचे कुटुंब माझ्या अत्यंत जवळचे आहे. त्याने जे साध्य केले आहे, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्याच्या संयम आणि प्रसंगावधानामुळे एक मोठा अनर्थ टळला,’ असे त्यांचे शेजारी दौलतभाई व्होरा म्हणाले.

मित्र प्रतीक गांधी यांनी मच्छार यांचे वर्णन महत्त्वाकांक्षी, अत्यंत नम्र आणि जमिनीवर पाय असणारी व्यक्ती असे केले.

मच्छार हे खरे हिरो - मुख्यमंत्री

विमान प्रवासादरम्यान गंभीर दुखापत झाल्यानंतरही शेकडो लोकांचे प्राण वाचवल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी कॅप्टन स्मित मच्छार यांचे ‘खरा हिरो’ म्हणून कौतुक केले. बिकट परिस्थिती हाताळताना मच्छार यांनी प्रसंगावधान आणि दाखवलेले धाडस कौतुकास्पद आहे. ‘तुम्ही एक प्रेरणा आहात. महाराष्ट्र आणि भारताला तुमचा अभिमान वाटतो’, असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in