वरळी हिट अँड रन घटनेचे पोलिसांकडून रिक्रिएशन; कारचालक राजऋषी बिदावतला न्यायालयीन कोठडी

वरळी हिट अँड रन गुन्ह्यांतील पोलीस कोठडीत असलेला मिहीर राजेश शहाचा कारचालक राजऋषी राजेंद्रसिंह बिदावत याची शिवडीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडीतून १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
वरळी हिट अँड रन घटनेचे पोलिसांकडून रिक्रिएशन; कारचालक राजऋषी बिदावतला न्यायालयीन कोठडी
Published on

मुंबई : वरळी हिट अँड रन गुन्ह्यांतील पोलीस कोठडीत असलेला मिहीर राजेश शहाचा कारचालक राजऋषी राजेंद्रसिंह बिदावत याची शिवडीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडीतून १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. दुसरीकडे मिहीर शहा आणि राजऋषी बिदावत या दोघांना घेऊन वरळी पोलिसांनी अपघाताच्या घटनेची पहिल्यापासून रिक्रिएशन केले होते. यावेळी त्यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली होती.

दारूच्या नशेत बीएमडब्ल्यू कारमधून जाताना मिहीरने वरळीच्या ॲॅनी बेझंट रोडवर एका बाईकला धडक दिली होती. या अपघातात कावेरी प्रदीप नाखवा या महिलेचा मृत्यू झाला तर तिचे पती प्रदीप नाखवा हे जखमी झाले होते. अपघाताच्या वेळेस मिहीरने कावेरीला दीड किलोमीटर फरफटत नेले होते. हा प्रकार लक्षात येताच ते दोघेही कारमधून खाली उतरले आणि त्यांनी अपघातात जखमी झालेल्या कावेरीला बाजूला करून रस्त्यावर टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र कार मागे घेताना कारच्या चाकाखाली आल्याने कावेरीचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर ते दोघेही कलानगरच्या दिशेने पळून गेले होते. तपासात घडलेला प्रकार या दोघांनी सांगितला. त्यानंतर गुरुवारी सकाळी पुन्हा त्याच वेळेस वरळी पोलिसांनी या दोघांनाही घटनास्थळी आणले होते. तिथे घटनेचा पुन्हा रिक्रिएशन करण्यात आले होते. बुधवारी मिहीरने अपघाताच्या वेळेस तो कार चालवत असल्याची कबुली देताना मद्यप्राशन केले नसल्याचा दावा केला होता. मात्र रिक्रिएशनच्या दरम्यान मिहीर हा दारूच्या नशेत असल्याचे उघडकीस आले. तशी कबुलीच त्याने आता पोलिसांना दिली आहे.

त्यापूर्वी मिहीर आणि राजऋषी यांची वरळी पोलिसांकडून समोरासमोर चौकशी करण्यात आली होती. दुसरीकडे या गुन्ह्यांतील कारचालक राजऋषी बिदावतला गुरुवारी दुपारी पुन्हा शिवडीतील न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलिसांकडून करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीऐवजी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविले. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला गुरुवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. या गुन्ह्यांचा तपास सुरू असून त्याची मुख्य आरोपी मिहीर शहा याच्यासोबत पुन्हा चौकशी करायची आहे, त्यांच्याकडून काही महत्त्वाच्या मुद्यांवर चौकशी करणे बाकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in