कारची झाडाला धडक; दोघांचा मृत्यू

कार चालविणे मृत दोन तरुणांच्या जिवावर बेतले असून, कारचालकाविरुद्ध हलगर्जीपणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कारची झाडाला धडक; दोघांचा मृत्यू

कांजूरगाव येथे बुधवारी रात्री सव्वाबारा वाजता एका भरवेगात जाणाऱ्या कारने झाडाला धडक दिली. या अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. मृतांमध्ये जुनेद सलीम कुरेशी आणि साहिल कुरेशी यांचा समावेश आहे, तर आयान हाजीम कुरेशी हा गंभीर जखमी झाला आहे. इतर सहा जणांना प्राथमिक औषधोपचारानंतर सोडून देण्यात आले. भरवेगात कार चालविणे मृत दोन तरुणांच्या जिवावर बेतले असून, कारचालकाविरुद्ध हलगर्जीपणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा अपघात विक्रोळीतील कांजूरगाव बसस्टॉपजवळ झाला. अपघात स्थळी पोलिसांना नऊ जण जखमी झाल्याचे दिसून आले. या जखमींना तातडीने भांडुपच्या फोर्टीस आणि मुलुंडच्या वीर सावरकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी जुनैद आणि साहिल या दोघांना मृत घोषित करण्यात आले. ते दोघेही कुर्ला येथील कसाईवाड्यातील रहिवाशी आहेत. आयान कुरेशी हा गंभीररीत्या जखमी झाला असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अपघातात जखमी झालेल्या इतर सहा जणांना प्राथमिक उपचारानंतर सोडून देण्यात आले.

प्राथमिक तपासात कारच्या चालकाने कार भरवेगात चालविण्याचा प्रयत्न केल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्याने कांजूरगाव बसस्टॉपजवळील एका झाडाला धडक दिली. याप्रकरणी कारचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in