१७ वर्षांच्या मुलीच्या आत्महत्येप्रकरणी डॉक्टरविरुद्ध गुन्हा

आरोपानंतर तिच्या जबानीवरून कुरार पोलिसांनी अमोल हेमके याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचारासह आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला
१७ वर्षांच्या मुलीच्या आत्महत्येप्रकरणी डॉक्टरविरुद्ध गुन्हा

मुंबई : १७ वर्षांच्या मुलीच्या आत्महत्येप्रकरणी अमोल हेमके या डॉक्टरविरुद्ध कुरार पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. त्याच्यावर पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा मानसिक व शारीरिक शोषण करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यांत त्याला अद्याप अटक झाली नाही. शवविच्छेदन अहवालानंतर याबाबत अधिक तपशील समजू शकेल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. पीडित १७ वर्षांची मुलगी मालाड येथे राहत असून, ती तिच्या घरापासून काहीच अंतरावर असलेल्या डॉ. अमोल हेमके यांच्या दाताच्या क्लिनिकमध्ये मदतनीस म्हणून कामाला होती. २८ डिसेंबरला घरात कोणीही नसताना तिने गळफास लावून आत्महत्या केली होती. या आत्महत्येनंतर मृत मुलीच्या बहिणीने अमोल हेमके यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी तिच्या बहिणीवर लैंगिक अत्याचार करून तिचा मानसिक व शारीरिक शोषण केला होता. या छळाला ती कंटाळून गेली होती. त्यातून आलेल्या नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर तिच्या जबानीवरून कुरार पोलिसांनी अमोल हेमके याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचारासह आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता.

logo
marathi.freepressjournal.in