अभिनेत्रीची बदनामी केल्याप्रकरणी मित्राविरुद्ध गुन्हा

बदनामी केल्याप्रकरणी श्रीनिवास या मित्राविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे
अभिनेत्रीची बदनामी केल्याप्रकरणी मित्राविरुद्ध गुन्हा

मुंबई : जोगेश्‍वरी येथे राहणाऱ्या एका अभिनेत्रीची बदनामी केल्याप्रकरणी श्रीनिवास या मित्राविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. उसने पैसे मागितले म्हणून त्याने तिची बदनामी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. ३० वर्षांची तक्रारदार अभिनेत्री ही जोगेश्‍वरी येथे राहत असून सहा वर्षांपूर्वी तिची श्रीनिवाससोबत ओळख झाली होती. त्यानंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. याचदरम्यान त्याने तिच्याकडून काही पैसे उसने मागितले होते; मात्र ते पैसे त्याने तिला परत केले नव्हते. त्यावरून त्यांच्यात वाद झाला होता. पैसे घेऊन त्याने तिची फसवणूक केली होती. त्यामुळे तिने फेसबुकवर श्रीनिवासविरुद्ध चिटर आणि फ्रॉड असा मॅसेज टाइप करून एक स्टोरी अपलोड केली होती. ही स्टोरी त्याच्या निदर्शनास येताच त्याने तिला तिचे व्हिडीओ आणि फोटो सेक्स वेबसाइटवर व्हायरल करून तिची बदनामी करण्याची धमकी दिली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in