फसवणुकीप्रकरणी कंपनीच्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा

विलेपार्ले येथे राहणाऱ्या व्यावसायिक मेहुल उपेंद्र संघवी यांचा रेडिमेड गार्मेंटचा व्यवसाय असून स्वत:च्या पाच कंपन्या आहेत
फसवणुकीप्रकरणी कंपनीच्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा

मुंबई : फसवणुकीप्रकरणी कंपनीच्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याविरुद्ध सांताक्रुझ पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. रजनी ग्यानचंद्र शर्मा असे या महिलेचे नाव असून तिच्यावर सुमारे ३१ लाखांचा अपहार करून कंपनीची फसवणूक केल्याचा आरोप आहे. विलेपार्ले येथे राहणाऱ्या व्यावसायिक मेहुल उपेंद्र संघवी यांचा रेडिमेड गार्मेंटचा व्यवसाय असून स्वत:च्या पाच कंपन्या आहेत. त्यांच्या सांताक्रुज येथील हब मिलन कार्यालयात २० कर्मचारी कामाला असून एचआर विभागात रजनी शर्मा काम करत होती. कोरोना काळात काही कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडल्याने रजनी शर्माकडे एचआर आणि अकाऊंट विभागाची जबाबादारी सोपविण्यात आली होती. सप्टेंबर २०२३ रोजी त्यांना आयकरसंबंधित काही पेमेंट बाकी असल्याचे समजले होते. अकाऊंट विभागाने फेरतपासणी केली असता. सुमारे ३१ लाखांचे आक्षेपार्ह व्यवहार झाल्याचे दिसून आले. रजनी शर्मा हिच्या खात्यातून विमलादेवी शर्मा यांच्याखात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. चौकशीत रजनीने हिनेच अपहार केल्याची कबुली दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in