
मुंबई : क्रेडिटवर घेतलेल्या १ कोटी ३४ लाखांचा मालाचा अपहारप्रकरणी एका खाजगी कंपनीच्या तीन संचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पवन दुजारी, रिया दुजारी आणि शिवरतन दुजारी अशी या तिघांची नावे असून ते तिघेही दुजारा टेक्सटाईल्स कंपनीचे संचालक असल्याचे पोलिसांनी सांगितले. या तिघांवर पेमेंट न करता कंपनीने दिलेल्या मालाची परस्पर विक्री करून फसवणूक केल्याचा आरोप आहे. सुहास शरदराव गाढे हे मूळचे रायगढचे रहिेवाशी असून, ते एका कंपनीत ऍडमीन मॅनेजर म्हणून कामाला आहेत. या कंपनीची दुजाारी टेक्सटाईल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही ग्राहक आहे.
या कंपनीत पवन दुजारी, रिया दुजारी आणि शिवरतन दुजारी असे तिघेही संचालक म्हणून काम करतात. त्यांच्या कंपनीत मोठ्या प्रमाणात कच्चा माल उपलब्ध असल्याने त्यांनी ती माहिती काही ग्राहकांना दिली होती. त्यांच्यासोबत कंपनीचा व्यवहार असल्याने कंपनीने दुजारी कंपनीला २४ फेब्रुवारी ते १२ मार्च २०२२ या कालावधीत १ कोटी ३४ लाख रुपयांच्या कच्च्या मालाची डिलीव्हरी केली होती.