Bhayandar : लव्ह जिहाद करणाऱ्या पतीविरोधात गुन्हा

खोट्या नावाचा आणि धर्माचा आधार घेऊन, आपली खरी ओळख लपवून लग्न करणाऱ्या आणि त्यानंतर शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या एका पतीविरोधात भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Bhayandar : लव्ह जिहाद करणाऱ्या पतीविरोधात गुन्हा
Bhayandar : लव्ह जिहाद करणाऱ्या पतीविरोधात गुन्हा'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

भाईंंदर : खोट्या नावाचा आणि धर्माचा आधार घेऊन, आपली खरी ओळख लपवून लग्न करणाऱ्या आणि त्यानंतर शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या एका पतीविरोधात भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाईंदरमध्ये राहणारी पीडित महिलेने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. पीडितेचा पती आरोपी नुर आलम सद्दिक याने २७ एप्रिल २०१० रोजी स्वतःचे नाव मनोज बैजनाथ निर्मल असल्याचे सांगून आणि तो हिंदू धर्मीय असल्याचे खोटे सांगून पीडित महिलेशी लग्न केले होते. त्याने मुस्लिम असल्याची खरी ओळख पूर्णपणे लपवून ठेवली होती. लग्नानंतर काही काळाने पती मनोज नसून नुर आलम सद्दिक हा मुस्लिम असल्याचे पीडितेच्या निदर्शनास आले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर पीडितेने त्याचा त्याला जाब विचारला असता, आरोपी पतीने तिला सातत्याने बेदम मारहाण करून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तिला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. पीडितेच्या माता-पित्यांना फोन करून शिवीगाळ करणे आणि पीडितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तुझे बाहेर दुसऱ्यासोबत संबंध आहेत असे खोटे आरोप करत तिचा तीव्र मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. २०१० साला पासून सुरू असलेला हा त्रास असह्य झाल्याने शेवटी पीडितेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

Bhayandar : लव्ह जिहाद करणाऱ्या पतीविरोधात गुन्हा
Palghar : अघोरी उपायांच्या नावाखाली अल्पवयीन मुलीला जंगलात नेलं; ५५ वर्षीय भोंदू बाबाकडून अत्याचार

याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून नवघर पोलिसांनी आरोपी नुर आलम सद्दिक विरोधात विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल तनपुरे करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in