हॉटेल पार्टीत तरुणीचा विनयभंग

तरुणीच्या विनयभंगप्रकरणी पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना वांद्रे युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. समद रईस खान आणि मोहम्मद आसिफ अब्दुल रशीद खान अशी या दोघांची नावे असून चौकशीसाठी आंबोली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे
हॉटेल पार्टीत तरुणीचा विनयभंग

मुंबई : हॉटेल पार्टीत एका तरुणीच्या विनयभंगप्रकरणी पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना वांद्रे युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. समद रईस खान आणि मोहम्मद आसिफ अब्दुल रशीद खान अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही पुढील चौकशीसाठी आंबोली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

तक्रारदार तरुणी ही शनिवारी अंधेरीतील एका हॉटेलमध्ये गेली होती. पहाटेपर्यंत रंगलेल्या पार्टीच दोन जण आल्यानंतर त्यापैकी एका तरुणाकडे पिस्तूल होते. याच पिस्तूलचा धाक दाखवून त्याने तिथे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने तक्रारदार तरुणीशी अश्‍लील वर्तन करून तिचा विनयभंग केला होता. या घटनेनंतर तिने आंबोली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी ३४०, ३५४ अ, ५०९, ३४ भादवी सहकलम ३, २५ भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला होता. सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in