राजन साळवींवर गुन्हा दाखल; संबंधित ठिकाणांवर छापे

कुटुंबातील दोन सदस्यांविरुद्ध बेहिशोबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
राजन साळवींवर गुन्हा दाखल; संबंधित ठिकाणांवर छापे

मुंबई : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना (ठाकरे गट) आमदार राजन साळवी यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी छापे टाकले. तसेच त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्यांविरुद्ध बेहिशोबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

याबद्दल एका अधिकाऱ्याने अधिक माहिती देताना सांगितले की, “एसीबीच्या ठाणे युनिटच्या पथकाने रत्नागिरी जिल्ह्यात साळवी यांच्याशी संबंधित पाच ठिकाणी छापे टाकले.” साळवी यांनी तीन वेळा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाशी संबंधित आहेत. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, साळवी, त्यांची पत्नी आणि मुलाने ३.५३ कोटी रुपयांची संपत्ती जमा केली, जी त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा अधिक व बेहिशेबी आहे. साळवी, त्यांची पत्नी आणि मुलाविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कलम १३ (१) (बी) आणि १३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in