शहरात तीन विविध अपघातप्रकरणी गुन्हे दाखल

अपघातप्रकरणी बांगुरनगर, नवघर आणि कस्तुरबा मार्ग पोलिसांनी गुन्हे दाखल आहेत
शहरात तीन विविध अपघातप्रकरणी गुन्हे दाखल

मुंबई : शहरात झालेल्या तीन विविध अपघातप्रकरणी बांगुरनगर, नवघर आणि कस्तुरबा मार्ग पोलिसांनी गुन्हे दाखल आहेत. यातील एक अपघात तीन महिन्यांपूर्वी झाला होता. तपासानंतर सोमवारी पोलिसांनी मृत अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. सोमवारी सकाळी मुलुंड येथील एका अपघातात सुमीत गौर या ३४ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी मुलुंडच्या ऐरोली खाडी ब्रिजवर वेदप्रकाश या रिक्षाचालकाने रिक्षा चालवून उजव्या बाजूला वळण घेण्याचा प्रयत्न केला. त्यात मागून येणाऱ्या सुमीतचे बुलेटवरील नियंत्रण सुटले. तो खाली पडून गंभीर जखमी झाला. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता, तिथे त्याला मृत घोषित केले. दुसऱ्या अपघातात विनोद भागुराम पवार या ५५ वर्षीय मॅकनिकचा मृत्यू झाला. १५ ऑगस्टला विनोद हे कामावरून घराच्या दिशेने जात होता. यावेळी एका टेम्पोने त्यांना धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाला होता. त्यांच्यावर शीव रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान १९ ऑगस्टला त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी बांगुरनगर पोलिसांनी अपघातानंतर पळून गेलेल्या टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान तीन महिन्यांपूर्वी बोरिवलीतील कृष्णा इमारतीसमोर एक अपघात झाला होता. या अपघातात नेतन कार्ल जेरी फर्नाडिस या १७वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. तीन महिन्यानंतर कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अपघातप्रकरणी नेवलविरुद्ध हलगर्जीपणाने स्कूटी चालवून स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in