नौदलाच्या माजी कॅप्टनवर CBI ने नोंदवला गुन्हा; बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा आरोप; मुंबई डॉकयार्डमध्ये बजावली होती सेवा

नौदलाच्या एका माजी कॅप्टनविरोधात सीबीआयने उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा जास्त संपत्ती जमवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेले हे अधिकारी मुंबईतील नौदल डॉकयार्डमध्ये कार्यरत होते. ३१ मे २०२४ रोजी ते सेवेतून निवृत्त झाले असून, त्यांच्या भ्रष्टाचाराबाबत सीबीआयला गुप्त माहिती मिळाली होती.
नौदलाच्या माजी कॅप्टनवर CBI ने नोंदवला गुन्हा; बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा आरोप; मुंबई डॉकयार्डमध्ये बजावली होती सेवा
नौदलाच्या माजी कॅप्टनवर CBI ने नोंदवला गुन्हा; बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा आरोप; मुंबई डॉकयार्डमध्ये बजावली होती सेवा(संग्रहित छायाचित्र)
Published on

सोमेंद्र शर्मा/मुंबई

नौदलाच्या एका माजी कॅप्टनविरोधात सीबीआयने उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा जास्त संपत्ती जमवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेले हे अधिकारी मुंबईतील नौदल डॉकयार्डमध्ये कार्यरत होते. ३१ मे २०२४ रोजी ते सेवेतून निवृत्त झाले असून, त्यांच्या भ्रष्टाचाराबाबत सीबीआयला गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे अधिकाऱ्याची सेवा, कुटुंब, उत्पन्न आणि मालमत्ता या सर्व तपशिलांची प्राथमिक चौकशी करून ही कारवाई करण्यात आली आहे.

संशयित अधिकाऱ्याने आपल्या सेवाकाळात स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या नावावर मोठ्या प्रमाणावर जंगम आणि स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचे तपासात उघड झाले आहे. या बेकायदेशीर संपत्तीच्या मोजदादीसाठी १ एप्रिल २०१० ते ३१ मार्च २०२० हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या १० वर्षांच्या काळात गोळा केलेली मालमत्ता त्यांच्या कायदेशीर उत्पन्नाच्या तुलनेत प्रथमदर्शनी विसंगत आढळली आहे.

logo
marathi.freepressjournal.in