११९ कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी CBI चे छापे; मुंबई व अहमदाबादमधील सात ठिकाणी धाडी

पंजाब नॅशनल बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना ११९ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा गंडा घातल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शुक्रवारी मोठी कारवाई केली.
११९ कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी CBI चे छापे; मुंबई व अहमदाबादमधील सात ठिकाणी धाडी
११९ कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी CBI चे छापे; मुंबई व अहमदाबादमधील सात ठिकाणी धाडी(संग्रहित छायाचित्र)
Published on

मुंबई : पंजाब नॅशनल बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना ११९ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा गंडा घातल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शुक्रवारी मोठी कारवाई केली. सीबीआयच्या पथकांनी या फसवणूक प्रकरणांच्या तपासासाठी मुंबई आणि अहमदाबादमधील सात वेगवेगळ्या ठिकाणांवर छापे टाकले.

श्री हरी एक्सट्रूजन प्रायव्हेट लिमिटेड आणि जय फॉर्म्युलेशन्स लिमिटेड या कंपन्यांच्या संचालकांच्या निवासी आवारावर हे छापे टाकण्यात आले असून, दोन्ही शहरांमधील विशेष न्यायालयांकडून शोध वॉरंट मिळवल्यानंतर गुरुवारी ही कारवाई करण्यात आली.

पहिल्या प्रकरणात श्री हरी एक्सट्रूजन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने पंजाब नॅशनल बँकेकडून घेतलेल्या कॅश क्रेडिट आणि टर्म लोन सुविधांचा गैरवापर करून बँकेची ६१.९८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. कर्ज मंजूर झाल्यानंतर कर्जदारांनी निधीचा गैरवापर केला आणि असुरक्षित कर्जे, भगिनी संस्थांसोबतचे व्यवहार तसेच कर्जदार बँकेत विक्रीची रक्कम जमा न करता ती इतरत्र वळवल्याचा आरोप केला. मुंबईतील सीबीआय प्रकरणांच्या विशेष न्यायाधीशांनी जारी केलेल्या वॉरंटच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून, झडतीदरम्यान अधिकाऱ्यांनी आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली आहेत. दुसऱ्या प्रकरणात जय फॉर्म्युलेशन्स लिमिटेड कंपनीने एसबीआयची ५७.५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

११९ कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी CBI चे छापे; मुंबई व अहमदाबादमधील सात ठिकाणी धाडी
व्यावसायिक दीपक कोचर यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; ED च्या 'त्या' कारवाईला स्थगिती

न्यायालयाच्या वॉरंटनंतर छापे

अहमदाबाद येथील न्यायालयाच्या वॉरंटनंतर संचालकांच्या निवासस्थानांवर हे छापे टाकण्यात आले असून, दोन्ही प्रकरणांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे एकूण ११९.०३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या दोन्ही प्रकरणांचा कसून तपास सुरू असल्याचे सीबीआयने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in